Dnamarathi.com

Maharashtra Election :  राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तसेच पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.  

तर दुसरीकडे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवार यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातून ही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले. त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून ही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. परवेज अशरफी यांनी लोकसभेसाठी देखील अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाने दिलेल्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.

नुकतेच पैगंबर साहेब यांच्याविरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजप नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी साठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीने इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ परवेज अशरफी, ताहर शेख, ऍड सलीम सय्यद, अमीर खान, इम्रान शेख, सफवान कुरेशी, बिलाल शेख, इस्माईल शेख आदी उपस्थित होते.

अर्ज दाखल केल्यावर डॉ परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलतांना संगितले की अहमदनगर जिल्ह्यातून सर्वच 12 विधानसभेतील इच्छुक पक्षाकडे दावेदारी अर्ज दाखल करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकस आघाडीला भरभरून मतदान केले. परंतु मविआ ने लोकसभेत एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिलेला नाही.आणि औरंगाबाद मधून इम्तियाज जलील यांना पराभव करण्यासाठी दोन्ही गटबंधनने पूर्ण शक्ती लावली.

 तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला माविआ ने निराशा केले. एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. याचाच अर्थ माविआला मुस्लिम अल्संख्यांक समाजाचे मत पाहिजे परंतु मुस्लिम समाजाचा नेता नको. महायुती बद्दल बोलतांना डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की हे तर महाविकास आघाडी पेक्षा एक पाऊल पुढे आहे. यांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजच नको मुख्यमंत्री ज्या व्यक्तीने प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचे सवरक्षण करतात.

 तर गृहमंत्री त्यांची सुरक्षेत वाढ करून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की जो मुस्लिम समजविरोधत बोलेल त्यांना सरकार पूर्ण सुरक्षा देईल. यांचे आमदार मुस्लिम समजला घुसून मारण्याची धमकी देतात आणि गृहमंत्री त्यांची पाठ राखण करतात. यावरून स्पष्ट दिसते की ना महाविकास आघाडी ना महायुती यांना मुस्लिम समाजाची गरज आहे. 

जर मुस्लिम समाज आपल्या सोबत इतर समाज घेऊन इतर समाजाचे लोकांना एकत्र घेऊन येणारे विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल तर चांगलेच आहे. प्रत्येक समाजाचा नेतृत्व विधानसभेत असणे गरजेचे असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

सध्या अहमदनगर मध्ये सामान्य नागरिकांत चर्चा आहे की अहमदनगरचा भावी आमदार सामान्य जनतेला पाहिजे. वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे त्याला कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. अहमदनगर शहराला असा आमदार पाहिजे जो प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालेल. जाती जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवणार लोक प्रतिनिधी नको.

यामुळे पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. मला आशा आहे की पक्ष अहमदनगर मधून उमेदवारी देताना माझा विचार करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *