Dnamarathi.com

Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का देणाऱ्या काँग्रेसने सहा महिन्यांतर्गतच हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारल्याने पुन्हा एकदा काँग्रेसच्या संघटनावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कमकुवत संघटना आणि गटबाजीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले असल्याचे विधान केले आहे.

दोन दारुण पराभवांची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. गटबाजीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आता जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनीही काँग्रेस अध्यक्षांना कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पक्षातील दुफळीकडे बोट दाखवत खर्गे म्हणाले की, शिस्तीचा अभाव खपवून घेतला जाऊ शकत नाही. सध्याच्या काळातील आव्हाने ओळखून जुन्या पद्धतीचा अवलंब करून निवडणूक जिंकता येणार नाही, असे ते म्हणाले.

हरियाणात पक्षाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे वरिष्ठ नेत्यांची एकमेकांविरोधातील भाषणबाजी आणि गटबाजी. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी यातून धडा घेतला नाही आणि त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. नाव न घेता खर्गे म्हणाले की, काही नेते सतत इतर नेत्यांविरोधात वक्तव्य करतात. पक्षांतर्गत अशा गटबाजीमुळेही नुकसान होते. कार्यकर्त्यांमध्ये शिस्त लागावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठांनीही आपली जबाबदारी समजून घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *