Pankaja Munde : दिवसेंदिवस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाद होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा 19 कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी न भरल्यामुळे नोटीस देण्यात आली होती. आता त्यांना पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.
नेमकं कारण काय?
या कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची तब्बल 61 लाख 47 हजार रुपये रक्कम थकवली आहे. ही रक्कम भरली नसल्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने त्यांच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे. मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
कारखाना बंद असल्याने या साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे भरली नाही. त्यामुळे ही नोटीस दिली आहे. हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, जीएसटीची नोटीस आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पैसे जमा केल्यानंतर पंकजा मुंडे भारावून गेल्या होत्या.
पण त्यांनी हे पैसे घेतले नाहीत. “तुमचे प्रेम माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील खात्यात जमा करा. तेच माझ्यासाठी खूप गरजेचे आहे. मला तुमच्याकडून रक्कम घेणं योग्य वाटत नाही. कारण माझा स्वाभिमान मला ते करू देत नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.