Maharashtra News: अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पंकज आशिया सिद्धाराम सालीमठ यांची जागा घेणार आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धाराम सालीमठ यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली होती.
तेव्हापासून नगरची जागा रिक्त होती. आता राज्य सरकारने यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
याच बरोबर राज्य सरकारने आणखी 7 आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. गेल्या महिन्यात देखील राज्य सरकारे 21 पेक्षा जास्त आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली होती. ज्यामध्ये सिद्धाराम सालीमठ यांच्या देखील नावाचा समावेश होता.
तर आता पुन्हा एकदा राज्य सरकारने 8 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.