Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दिले आहे.
माहितीनुसार, निवडणूक बाँडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जन अधिकार संघर्ष परिषदेचे आदर्श आर. अय्यर यांनी तक्रार दाखल केली होती.
न्यायालयाने शुक्रवारी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आणि पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. कोर्टाने टिळक नगर पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र, भाजप नेते नलिन कुमार कटील, केंद्रीय आणि राज्य भाजप कार्यालये आणि ईडी विभागाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एप्रिल 2019 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत, उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या कंपनीकडून सुमारे 230 कोटी रुपये आणि अरबिंदो फार्मा कंपनीकडून 49 कोटी रुपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसूल करण्यात आले आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरही निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसुली केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आधी निर्मला सीतारामन यांना खुर्चीवरून हटवावे. त्यानंतर माझा राजीनामा मागा, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले आहेत.