Nitin Gadkari : नागपूरमधील एका खाजगी कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गांधी आणि नेहरूंचे उदाहरण देत सांगितले की पंडित जवाहरलाल नेहरू नेहमीच म्हणायचे की अधिक उत्पादन झाले पाहिजे. तेच महात्मा गांधी म्हणायचे की अधिक उत्पादनासोबतच लोकांना अधिकाधिक रोजगार मिळाला पाहिजे.
रोजगार निर्माण करणे ही आपली पहिली प्राथमिकता आहे. येत्या काळात जर यशस्वी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगार वाढवे गरजेचे आहे. याबरोबर विदर्भातील निर्यात वाढवण्याची गरज आहे. जर विदर्भ समृद्ध झाला तर महाराष्ट्र समृद्ध होईल आणि मग भारत समृद्ध होईल. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल. असं मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.