Nitesh Rane on Rahul Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करणार आहे. विधानसभा निवडणुकीत एनडीएने 243 पैकी 202 जागा जिंकल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत राहुल गांधी यांचा पार्ट टाइम राजकारणी म्हणून उल्लेख केला आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, राहुल गांधी हे देशासाठी पर्यटक आहेत. ते देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी आहेत. अशांना भारतीय म्हणायचं का? हा प्रश्न आहे. बिहारच्या जनतेने अशा लोकांना स्पष्ट नाकारलं आहे. लोकशाहीची थट्टा करणं ही राहुल गांधींची सवय आहे. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारून NDA ला संधी दिली असं माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले.
तसेच लालू प्रसाद यादव यांच्या काळात कायदा-सुव्यवस्था ढासळली होती. पण नितीश कुमार आणि मोदी सरकारने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. विविध योजना आणल्या आणि त्याचं प्रतिबिंब निकालात स्पष्ट दिसलं असं देखील नितेश राणे म्हणाले.
तर दुसरीकडे हिंमत असेल तर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान देखील त्यांनी यावेळी काँग्रेसला दिले.






