Navneet Rana : निवडणूक आयोगा विरोधात आज राज्यातील विरोधी पक्षांनी एकत्र येत मुंबईत सत्याचा मोर्चा काढत मतदार यादी दुरुस्त करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा म्हटलं लोकशाही जिवंत आहे, विधानसभेमध्ये पराभूत झाले तर म्हणता लोकशाहीची हत्या झाली अशी टीका माध्यमांशी बोलताना माजी खासदार नवनीत राणा यांनी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आले असल्याचा दावा देखील यावेळी नवनीत राणा यांनी केला.
माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्यापूर्वी राज ठाकरे म्हणायचे मज्जीद वरचे भोंगे काढा, हनुमान चालीसा म्हनायला लावत होते असं यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.
तसेच लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा म्हटलं लोकशाही जिवंत आहे, विधानसभेमध्ये पराभूत झाले तर म्हणता लोकशाहीची हत्या झाली असं देखील यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.






