Nashik Accident : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह राज्यात रस्ते अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणात सुरू असून या अपघातात अनेक जण जखमी होत आहे. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
तर दुसरीकडे नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात झाला घटना बसवंत पिंपळगाव येथे घडली आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, बसवंत पिंपळगाव येथून इनोव्हा. एम एच 15 बी एन झिरो 0555 या क्रमांकाचे चार चाकी वाहन वनी येथील नांदुरी गडावर दर्शनासाठी जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात ड्रायव्हरचा तोल गेल्याने कार 400 फूट दरीत कोसळून कार मधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.
वाहन चालक हा गंभीर जखमी असून त्यास स्थानिक च्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळी वणी ग्रामीण पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी येऊन रेस्क्यू ऑपरेशन करून वाहन चालकाला उपचारासाठी दाखल केले.
घटनेचा अधिक तपास घटनेचा अधिक तपास वणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नांदुरी गाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी करत आहे.






