Nagpur News: नागपूर शहरात पोलिसांनी कारवाई करत चालत्या गाडीत रोमान्स करणाऱ्या एका जोडप्याला अटक केली आहे.
नागपूर पोलिसांनी 28 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि त्याचा गर्लफ्रेंडविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. तसेच या कारवाईत कारही जप्त करण्यात आली आहे.
मुलगी इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही गाडी चालवताना अश्लील कृत्य करताना दिसत आहेत.
एका कथित व्हिडिओमध्ये, सूरज धरमपेठ परिसरात सोनी कार चालवताना दिसत आहे, तर मुलगी ड्रायव्हिंग सीटवर सूरजच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. यादरम्यान दोघेही अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलवर व्हिडिओ बनवला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.
कारच्या क्रमांकाच्या मदतीने पोलिसांनी कारच्या मालकाचा शोध घेतला आणि त्यानंतर या जोडप्याला पकडले. मात्र, नंतर दोघांनाही जामीन मिळाला.
आरोपी सूरज राजकुमार सोनी आणि त्याच्या मैत्रिणीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BRS) च्या कलम 296 (अश्लीलता), 281 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 293 (सार्वजनिक ठिकाणी उपद्रव) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासोबतच एफआयआरमध्ये मोटार वाहन कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याची कलमेही जोडण्यात आली आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.