Dnamarathi.com

Oplus_16908288

Harshwardhan Sapkal: नागपूर शहरात घडलेला दगडफेकीची घटना अनावश्यक व अत्यंत दुर्देवी आहे. नागपूरकरांनी शांतता राखावी अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती मी सर्व नागपूरवासियांना करतो.

नागपूर शहरात सर्व धर्मीय लोक अत्यंत गुण्यागोविंदाने व आनंदाने रहात आहेत. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर आहे. या शहरात एवढ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो दगडफेक, जाळपोळ होते हे गृहविभागाचे अपयश आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री जाणिवपूर्वक प्रप्रक्षोभक वक्तव्ये करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना नागपूरमध्ये यश आले आहे असे दिसते. राज्यासमोर अनेक ज्वलंत प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला भाव नाही सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम मिळाली नाही, मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या सुरु आहेत. यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी सत्ताधारी सातत्याने प्रक्षोभक वक्तव्ये करत होते त्याचा हा परिपाक आहे.

नागपूर सामाजिक सलोखा जपणारे शहर आहे. देशाच्या इतर भागात दंगली होत असताना नागपूरात कधीही दंगल झाली नव्हती रामनवमीला हिंदू मुस्लीम एकत्रीतपणे रथ ओढतात ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यात मुस्लिमांपेक्षा जास्त हिंदू दर्शनाला जातात राजकीय फायद्यासाठी नागपूर पेटवण्याचा डाव आपण ओळखावा आणि शांतता राखावी असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *