DNA मराठी

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

Sangram Jagtap: गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने आणि एका विशिष्ट धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने नगर शहराचे आमदार संग्राम जगताप राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. तर दुसरीकडे आता त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी आली आहे. या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा इशारा देण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *