DNA मराठी

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे पुन्हा एकदा ‘या’ कारणासाठी आला चर्चेत !

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे हे नाव मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला नवीन नसलं तरी तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका करून चर्चेत असणारा अभिनेता आहे. आता पुन्हा एकदा नव्याने तो  चर्चेत आला आहे ते म्हणजे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “विस्फोट” ह्या चित्रपटाच्या निमित्ताने. 

रितेश देशमुख, फरदीन खान, सीमा बिस्वास ह्या बहुचर्चित नावांच्या यादीत आपल्या ह्या मराठमोळ्या अभिनेत्याचं ही नाव आता कौतुकाने आणि बरोबरीने घेतलं जातंय. मराठी प्रेक्षकांना याचा नक्कीच अभिमान आहे ही कौतुकाची बाब आहे.दिग्दर्शक कुकी गुलाटी ह्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने ह्या चित्रपटात केलेल्या अभिनयाची विशेष चर्चा होत आहे. 

मुळात आपल्या कामाच्या निवडी बाबत काटेकोर असल्यामुळे नचिकेत कायमच अत्यंत महत्त्वाच्या आणि आशयघन चित्रपट आणि नाटकांचा भाग असतो.  “तू” “रामप्रहर” “सिंधू सुधाकर रम आणि इतर” अश्या प्रायोगिक नाटकांच्या सोबत “दिल दोस्ती दुनियादारी” “पिंजरा” “लक्ष्मणरेषा” ह्या सारख्या मालिकांच्या आणि “अस्तू” “मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर” इत्यादी कलात्मक चित्रपटांच्या बरोबरीनेच मुख्य प्रवाहातील “फोर्स 2” “रॉकी हँडसम” “दगडी चाळ – 2” अश्या अनेक दर्जेदार कलाकृींमध्ये त्यानी ह्या पूर्वी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 

आता पुन्हा एकदा अनेक नवनवीन आणि उत्तमोत्तम कलाकृतींच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर येत आहे. नचिकेत भविष्यात अनेक उत्तम प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे यात शंका नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *