Dnamarathi.com

 Mumbai News: कल्याण परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजच्या रूममध्ये  महिलेचा मृतदेह सापडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्थानक संकुलात असलेल्या तृप्ती लॉजच्या एका रूममध्ये 32 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घाटकोपर येथील रहिवासी ज्योती तोडरमल असे महिलेचे नाव आहे.


ठाणे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी कल्याण शहरातील एका लॉजमध्ये मृतदेह आढळून आला. अधिकाऱ्याने सांगितले की, हाऊसकीपिंग कर्मचार्‍यांना रूममध्ये महिला संशयास्पदरित्या मृतावस्थेत पडलेली आढळली. तर मृत महिलेचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाला आहे. एमएफसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून आरोपीला पकडण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

शनिवारी दुपारी ज्योती या भूपेंद्र गिरी नावाच्या तरुणासोबत तृप्ती लॉजमध्ये आली होती. सकाळी बराच वेळ होऊनही रूमचा दरवाजा न उघडल्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर ज्योती मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर तातडीने महात्मा फुले पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन  पोस्टमार्टमसाठी   पाठवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीसोबत आलेला भूपेंद्र गिरी शनिवारी रात्री आठच्या सुमारास लॉजमधून बाहेर पडला होता. सामान घेण्यासाठी बाहेर जात असल्याचे त्यांनी लॉज मालकाला सांगितले. मात्र तो परतला नाही. सध्या फरार असलेल्या भूपेंद्र गिरीवर हत्येचा संशय व्यक्त केला जात असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत.

या दुहेरी हत्याकांडाला दहा दिवस उलटले असताना याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तृप्ती लॉजच्या खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली असल्याची माहिती आहे. सध्या ही हत्या का आणि केव्हा झाली याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *