Dnamarathi.com

 Mudassar Sheikh : मुदस्सर शेख माजी नगरसेवक महानगरपालिका अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्हा अधिकारी निवेदन देऊन ऑनलाइन शिधापत्रिका प्रणाली व्यवस्थित करुन नागरिकांना लाभ मिळून देण्याची मागणी केली आहे.  

अहमदनगर अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या गलथ्य कारभारामुळे प्रात्र कुटुंबांना रेशन (धान्य) व आयुष्यमान भारत योजने पासुन वंचित रहावे लागत आहे यामुळे ऑनलाइन शिधापत्रिका प्रणाली व्यवस्थित करुन नागरिकांना लाभ मिळुन द्यावा नाहीतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

 त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 16 मे 2023 रोजी सामान्य प्रशासन शासन निर्णय अन्वये, ई शिधापत्रिका सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्याकरीता RCMSmahafood हि प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली होती मात्र अन्न धान्य वितरण कार्यालय येथे सदर शासन निर्णयाची अमलबजावणी होत नाही. 

 जे नागरीक अंत्योदय योजना (AYY), प्राधान्य कुटुंब योजनेचे (PHH) लाभार्थी आहे अश्या नागरीकांचे Public Login वरुन ऑनलाईन प्रकरण सादर करण्यास नागरीकांना शासनाने मुभा करुण दिलेली आहे. तरीही जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांनी सहाय्यक पुरवठा अधिकारी कार्यालय येथे DEO Officer प्रत्येकी 3 अधिकारी, Supply Inspector 3 अधिकारी व TFSO 1 अधिकारी दिलेला असुन सदर कार्यालयत वरिल अधिकारी ऑनलाईन शिधापत्रिकाची नोंदणी करत नाही व रास्त भाव दुकानदार किंवा सेतु कार्यालय येथे पाठतात.

 यामुळे नागरिकांची खुप पळापळ होत आहे. जे नागरिक प्राधान्य कुटुंब यांजनाचे लाभार्थी साठी कागदपत्राची पुरतता करतील तर त्यांना PHH योजनेचा लाभ द्यावा कारण PHH योजनेचे शिधापत्रिकाचे नाव हे आयुष्यमान भारत योजने मध्ये येत आहे.

यामुळे सदर प्रणाली व्यवस्तीत चालवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा अंदोलन करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *