Asaduddin Owais: अहिल्यानगर शहरात एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेपूर्वी पोलिसांनी खासदार ओवैसी यांना सभेसाठी काही अटी आणि शर्ती घातल्याने सभेत बोलताना ओवैसी यांनी फक्त मलाच लव्ह लेटर का? असा प्रश्न विचारत पोलिसांचा भरपूर समाचार घेतला.
या सभेत बोलताना खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता येतो, जेव्हा ठाकरे गटाचा नेता येतो, जेव्हा आरएसएसची सभा असते आणि जेव्हा भाजपचा नेता येतो तेव्हा पोलीस त्यांना लव्ह लेटर देत नाही. फक्त आम्हालाच लव्ह लेटर मिळतो कारण पोलिसांना देखील माहिती मर्द फक्त एकच आहे. अश्या शब्दात खासदार ओवैसी यांनी पोलिसांचा समाचार घेतला.
पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये मी भारताचा नेतृत्व दुसऱ्या देशामध्ये केलं. कतरचे एक शेख पॅलेस्टाईन संबंधी भारताविषयी बोलत होते तेव्हा माझ्या डेलिगेशनने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्या शेख ला उत्तर दिलं की भारतापेक्षा तर तुमचा हा कतर पॅलेस्टाईनच्या अगदी जवळ आहे मग तुम्ही का नाही पहिले मदत पोहोचवत आणि भारत याने आपला एक हिस्सा हा पॅलेस्टाईन साठी ठेवलेला आहे. असं मी कतर मध्ये भारताची साईट घेऊन सांगितलं आज मी भारतासाठी दुसऱ्या देशांशी लढत आहे तरी देखील जिथे मी जातो तिथे मला लव्ह लेटर दिला जातो आणि त्यात सांगितलं जातं की मी काय बोलावं आणि काय नाही ? बीजेपी पार्टीचे नेते येतात, शिंदे पार्टीचे नेते येतात, अजित पवार पार्टीचे नेते येतात तेव्हा त्यांना का हा लव्हलेटर दिला जात नाही. मी एकटाच मर्द पोलिसांना दिसतो का? आणि ज्या कलमान्वये मला हा लेटर देण्यात आला तो कलमला रद्द करण्यासाठी मीच 35 मिनिट सादनात भाषण केलं आहे. कदाचित पोलीस हे विसरले. पोलिसांनी दिलेला हा लव्ह लेटर मी रिजेक्ट करतो असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.