Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर आता सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे.
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 5 जून रोजी दिल्लीमध्ये एनडीएच्या घटक पक्षाची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठी निवड करण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी हजेरी लावली
समोर आलेल्या माहितीनुसार, 8 जूनला पंतप्रधानपदाची मोदी शपथ घेणार आहे. यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागा मिळाले असून त्यांनी बहुमतासाठी लागणारा 272 चा आकडा पार केला आहे. यामुळे मोदी पुन्हा एकदा राष्ट्रपतीकडे सरकार स्थापन करण्याच्या दावा करणार आहे आणि 8 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे.
दिल्लीत बुधवारी एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्यासह नितीश कुमार यांनी देखील एनडीएला समर्थन पत्र दिले आहे. याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एनडीएला समर्थन पत्र दिले आहे.