DNA मराठी

Mumbai Rape:  महाराष्ट्र हादरला, पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक

Mumbai Rape: बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

माहितीनुसार, पुन्हा एकदा राज्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईत एका 21 वर्षीय तरुणाने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. आरोपी तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेला भेटला होता.

POCSO कायद्याच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल

आरोपींनी अल्पवयीन मुलीला अंधेरीतील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिला गुजरातमध्ये नेऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनी मुलगी घरी परतली आणि तिने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला.

 मुलीने त्या व्यक्तीचा फोटो इंस्टाग्रामवर दाखवला आणि कुटुंबीयांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8 आणि 12 अंतर्गत अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईतील नागपाडा परिसरात आठ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *