Dnamarathi.com

Maratha Reservation: राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकारण तापले आहे.

 यातच मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा लढा तीव्र केला आहे. आणि सरकारला दिलेली डेडलाईन बदलली जाणार नाही अशी देखील भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे. 

 या वर खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, चर्चेनेच विषय मार्गे लागणार आहे. तसेच मराठा समाजाने देखील संयम दाखवला आहे. त्याचबरोबर सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे.

 त्यामुळे कोणत्याही निकषापर्यंत येण्याऐवजी आणखी काही कालावधी आहे. ओबीसी समाज असो अथवा मराठा समाज या दोन्हीही समाजाच्या भावना लक्षात घेत दोन्ही समाजाचे हित जोपासण्याचा काम राज्य सरकारकडून केलं जाईल अशी प्रतिक्रिया खासदार सुजय विखे यांनी दिली.

सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र डेडलाईन जवळ आली असता देखील कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे जरांगे यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे. 

जरांगे पुन्हा आक्रमक

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्यावतीने सरकारला दिलेली डेडलाईन दोन दिवसांवर आली आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबर असून, त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम असल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान पुन्हा एकदा जरांगेंनी आज माध्यमांशी बोलताना देखील दिलेल्या तारखेनंतर आमचं आंदोलन शांततेत होणार आणि आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवूनच चर्चा करणार, असं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *