Maratha Reservation: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहे. यामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिला आहे.
मात्र हा आरक्षण मान्य नाही, मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या अशी मागणी पुन्हा एकदा पाटील यांनी केली आहे.
तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केल्याने सध्या मराठा आरक्षण संघर्षामध्ये फूट पाडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे आता सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
अजय महाराज बारस्कर यांनी केलेल्या आरोपांवर आता मराठा समाजाच्या संघटने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून त्यांच्यावर टिका केली आहे.
अहमदनगर शहरात झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये अजय बारस्कर हा सुरवातीला खाकी कपडे घालून गाड्या लुटण्याचे काम करत होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.अजय बारस्कर यांनी एका लहान मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे आणि भिशी चालवण्याचे काम करत असताना भिशीचे पैसे घेऊन पळून गेले होते असं देखील आरोप यावेळी करण्यात आले.
सुरवाती पासून आंदोलनात फूट पडावी म्हणून बारस्कर प्रयत्न करत होते म्हणून त्यांना दोन महिन्यापूर्वीच संघटनेमधून हाकलून देण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली.
सरकारकडून या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे.