Dnamarathi.com

Manoj Jarange: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे यासाठी आज अखंड मराठा समाज अहमदनगरकडून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले.

तसेच जर जरांगे पाटील यांचे मागण्या पूर्ण झाले नाही तर तहसील कार्यालय नगर येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी त्यात प्रामुख्याने सगेसीयर अधिसूचनेची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून तिचे कामकाज जोमाने चालू ठेवावे. मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद सातारा मुंबई गॅझेट लागू करावे. इ. मागण्यांसाठी 17 सप्टेंबर पासून

अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आहे. सरकारने त्यांच्या या मागण्या मान्य न केल्यास मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अ. नगर यांच्यावतीने हे निवेदन दिलेपासून 48 तासात मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालय नगर येथे गोरख दळवी, संतोष आजबे, सखाराम गुंजाळ यांच्यासह काही मराठा बांधव आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *