Dnamarathi.com

Ajit Pawar: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करा आणि राज्यात बिहार पॅटर्न राबवा अशी मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आणि चर्चांना उधाण आले आहे. 

 द हिंदू वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्यातून दिलेल्या बातमीमुळे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे पुढच्या आठवड्यात दिल्लीत महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. 

माहितीनुसार, राज्यातील किमान 25 जागेवर मैत्रीपूर्ण लढत करावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी अमित शहांकडे  केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार मागील पंधरा-वीस दिवसापासून अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे. या चर्चेत जवळपास 40 जागांसाठी चर्चा झाल्याची माहिती आहे.  त्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येणाऱ्या जागा सोडण्यास तयार नसून तीन ते चार जागा संदर्भात अदलाबदल करण्यास तयार आहे. त्याचबरोबर काँग्रेस जिथं लढत आहे अशा दहा ते बारा जागा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्याची माहिती आहे. 

त्याचबरोबर महायुतीमध्ये आता महामंडळ वाटपासंदर्भात सुद्धा एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागच्या दोन दिवसात नक्की कुणाला कोणत महामंडळ देणार यासंदर्भात एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुती मधील नाराज नेत्यांचा सुर नरमण्याची शक्यता आहे. 

राज्यपाल नियुक्त 12 जागा संदर्भात देखील निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजप 6, शिवसेना 3, आणि राष्ट्रवादी 3 असं सूत्र ठरलं आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापर्यंत हे नाव जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *