Maharashtra News: सन २०२३/२४ म्हणजे मागच्या गळीत हंगामात मार्च २०२४ मध्ये ऊस घातलेल्या शेवटच्या पंधरवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्षयोद्धा श्री. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला ऊस घातला होता.
ज्यांचे पैसे देणे बाकी होते त्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना ते म्हणाले की, या आगोदर दिवाळीपुर्वी ५० टक्के रक्कम दिली होती. राहिलेले सर्व पैसे आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. आज रोजी ऊस बिलापोटी एक रुपया सुद्धा कारखान्याकडे देणे बाकी नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी काही अडचण आल्यास संघर्षयोद्धा श्री. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकाशी मो.बा. ८२७५४३८५७७ या नंबर वर संपर्क साधावा.