DNA मराठी

Maharashtra News : विकास हेच माझे ध्येय : डॉ. सुजय विखे पाटील

Maharashtra News:  केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ विकासाचीच कामे लोकांना सांगा असा संदेश सुद्धा त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. 

डॉ. सुजय विखे पाटील यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत. त्याच बरोबर मतदार संघातील बुथ कमीटीच्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन बुथ कमीट्या सक्षमिकरण करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी त्यांच्या सभा घेत प्रचाराची रणनिती कार्यकर्त्यांना समजावून सांगितली जात आहे. 

भापजच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्य आयोजित सात्रळ तालूका राहूरी येथील  कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुजय विखे यांनी केवळ विकास कामांची चर्चा करत उमेदवारांचा प्रचार करण्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात झालेल्या विकास कामे मतदारांपर्यंत पोहवा असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विरोधकांवर चर्चा करून त्यांना महत्व देऊ नका, मागील पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि पंतप्रधान  नरेंद्र मोदी  हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा राहील त्या व्यतिरिक्त कोणत्याही भूलथापांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये. 

तसेच सर्व स्थानिक हेवेहावे बाजूला ठेऊन ही निवडूक देशाची निवडूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी काम करा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *