Maharashtra Election: शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मेळावा पाथर्डी येथील विजय लॉन्स मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतत्वाखाली आमदार मोनिका राजळे यांना डावलुन हा निर्धार मेळावा घेऊन अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगांव-पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपटले असुन मेळाव्यात अरुण मुंढे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला आहे.
विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचे वक्तव्य यावेळी अनेकांनी बोलताना केले.
यावेळी भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसारवाडे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार, पंचायत समितीच्या सभापती सुनीता डौंड, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष शितल केदार, आत्माराम कुंडकर, भाऊ वाघमारे, बाळासाहेब सोनवने, बाळासाहेब डोंगरे, आत्माराम कुंडकर, बाळासाहेब कोळगे सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






