Devendra Fadnavis: अहिल्यानगरसह राज्यातील पुणे, नाशिक व अमरावती विभागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी विशेष मदत जाहीर करण्यात आली आहे.
जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रति हेक्टरी १०,००० प्रमाणे (कमाल ३ हेक्टरपर्यंत) मदत DBT पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच बियाणे व इतर अनुषंगिक बाबींसाठी सहाय्य एकूण मंजूर निधी १७६५ कोटी २२ लाख ९२ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.






