Maharashtra Election: राज्यात आता विधानसभेचे वारे वाहत आहे. येत्या काही दिवसात निवडणुकांची घोषणा देखील होणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आता आपापल्या तयारीला लागला आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना पुणे शहरातील एकही विधानसभा जागेवर उमेदवार देणार नाही.
माहितीनुसार जागा वाटपामध्ये पुण्यातील विधानसभा लढवण्याचा शिवसेनेने दावा सोडला आहे. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात सेनेचा एकही इच्छुक उमेदवार नसल्याने शिवसेनेने दावा सोडला असल्याची माहिती समोर येत आहे.
तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील 2 जागांवर शिवसेना निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. माहितीनुसार पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उमेदवार देण्याची शक्यता आहे.
तर दुसऱ्या बाजूला मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हडपसर आणि कोथरूड या दोन्ही मतदारसंघांवर दावा करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महादेव बाबर मधून पृथ्वीराज सुतार आणि चंद्रकांत मोकाटे यांचा नावाची जोरदार चर्चा आहे.