Maharashtra Crime: राज्यात गेला काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्हांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. यातच एक धक्कादायक बातमी आता समोर येत आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येते.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या भागात तीन वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खडबड उडाली आहे.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली ही घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली असून तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून 24 वर्षीय विजय संजय खैरनार याने चिमुकलीची दगडाच्या सहाय्याने हत्या केली.
त्यानंतर आरोपी फरार झाला या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी संजय खैरनार याला ताब्यात घेतले आहे रात्री उशिरा चिमुकलीचे शव पोस्टमार्टम करता मालेगाव मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण डोंगराळे गावावर शोककळा पसरली आहे रात्री उशिरापर्यंत एफआरआय दाखल करायचं काम सुरू होते.






