Maharashtra Crime : विसापूरवरून शिरूरकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात इसमांकडून हल्ला झाल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेत असं घडलं की, देवदैठण गावाच्या शिवारातून जाताना पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे शिंतोडे बसच्या चाकांमधून उडून बाजूने जाणाऱ्या कारवर गेले. यावरून कारचालक आणि एसटी चालक यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यावेळी कारचालकाने धमकीवजा शब्द उच्चारत चालकाला इशारा दिला.
यानंतर काही अंतरावर कारचालकाने आपल्या मित्राला बोलावून एसटी कंडक्टरला मारहाण केली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. संबंधितांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक पोलिस अधिक तपास करत आहेत.