Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत घेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीने राज्यात सरकार स्थापन केली आहे तर 15 डिसेंबर रोजी महायुतीकडून 39 आमदारांनी मंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे. मात्र अद्याप खातेवाटप न झाल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर पुढील दोन – तीन दिवसात खातेवाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.
या माहितीनुसार, खातेवाटप लांबणीवर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे खातेवाटपवर एकमत अजूनही नाही झालेले नाही त्यामुळे खातेवाटप लांबणीवर आहे. अर्थखात पाहिजे आणि राष्ट्रवादीला गृहनिर्माण पाहिजे असं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजप व शिवसेनाचे खातेवाटप तयार आहे.
15 डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात भाजपकडून 19 शिवसेनेकडून 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 09 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.