Dnamarathi.com

Sunil Tingre : विधानसभा निवडणुकीच्या काळात पॉर्श प्रकरणात अडकलेल्या आमदार सुनील टिंगरे यांना मोठा धक्का बसला आहे. आज वडगाव शेरीतील भाजपच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केला आहे.

माहितीनुसार, माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बापूसाहेब पठारे हे देखील यावेळी उपस्थित होते.

या प्रवेशाने आमदार सुनील टिंगरे यांना मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

आधीच अडचणीत सापडलेले आमदार सुनील टिंगरे या प्रवेशानंतर आणखी बॅकफूटवर आले आहे. राज्यात यावेळी हा विकास आघाडी आणि महायुती मध्ये काही मुख्य लढत होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *