Mahadev Jankar: भाजपा सोबत युती करणे ही भूतकाळातीर सर्वात मोठी चूक असल्याचं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केल आहे. ते अकोल्यात बोलत होते. तर जानकर पक्षाच्या एका बैठकीसाठी अकोल्यात आले होते तर यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.
भाजपाला पराभूत करण्यासाठी भाजप सोडून कोणाशीही युती करण्यासाठी आपण तयार असल्याच जानकर म्हणालेत. तर आता भाजपची काँग्रेस झाल्याचंही ते जानकर म्हणतात. इतर पक्षातील बदनाम आणि भ्रष्टाचारी नेत्यांना दबाव टाकून आपल्या पक्षात आणायचे आणि पक्ष मोठा करायचा असं भाजपचे धोरण असल्याचे ते म्हणालेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष जिथे शक्य झालं तिथे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, मनसे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणार असल्याचे ते म्हणालेत. तर ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही. त्या ठिकाणी पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी भविष्यात राजू शेट्टी, बच्चू कडू, शेतकरी कामगार पक्ष यांसह रविकांत तुपकरांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जानकर म्हणालेत. 2029 मध्ये लोकसभा लढणार असून यापुढे केंद्राच्याच राजकारणात राहणार असल्याचे ते म्हणाले आहेत. यापुढे केंद्रातच मंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.