Dnamarathi.com

Lok Sabha Election Dates 2024: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी तारखा जाहीर केले आहे.

 पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी प्रथम सांगितले की, निवडणुका हा एक सण, देशाचा अभिमान आहे.त्यांनी सांगितले की यावेळी 96.8 कोटी मतदार मतदान करणार आहेत. म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुमारे 97 कोटी लोक मतदान करतील. 

आगामी लोकसभा निवडणुकीत सुमारे 1.8 कोटी मतदार आहेत जे पहिल्यांदाच कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार आहेत. याशिवाय 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 19.47 कोटी आहे.

एकूण मतदारांमध्ये 49.7 कोटी पुरुष, 47.1 कोटी महिला आणि 48 हजार ट्रान्सजेंडर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील मतदार लिंग गुणोत्तर 948 आहे, 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “आमच्या मतदार यादीत 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 82 लाख आणि 100 वर्षांवरील 2.18 लाख मतदारांचा समावेश आहे.”

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, देशाला खऱ्या अर्थाने उत्सवपूर्ण, लोकशाही वातावरण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ जून 2024 मध्ये संपणार आहे. जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका होणार आहेत.

महाराष्ट्रात मतदान कधी….

पहिला टप्पा – 19 एप्रिल

 रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 26 एप्रिल

बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

तिसरा टप्पा 7 मे 

रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे 

नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा 20 मे 

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

यावेळी अहमदनगर जिल्ह्यात 4 थ्या टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी मतदान होत आहे. यावेळी अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघात एकाच दिवशी मतदान होणार असून मतमोजणी 4 जूनला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *