Dnamarathi.com

Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीला जबरदस्त धक्का बसला आहे. राज्यात महाविकास आघाडीने 30 पेक्षा जास्त जागा जिंकत भाजपच्या 400 पार मिशनला ब्रेक दिला आहे. 

मात्र दुसरीकडे देशासह महाराष्ट्र मध्ये देखील काँग्रेसने पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करत तेरा जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला भाजप पेक्षा चार जागा जास्त मिळाले आहे त्यामुळे राज्य सर्वाधिक खासदार असणारा पक्ष काँग्रेस ठरला आहे.  

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रात भाजपच्या खासदारांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने 13 जागांवर मजल मारली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने महाराष्ट्रात 45 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र त्यांना फक्त 17 जागा मिळाले आहे. 

महाराष्ट्रात भाजपला 9 जागा मिळाल्या आहेत, ज्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात जिंकलेल्या 23 जागांपेक्षा खूपच कमी आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

महाआघाडीतील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे) 7 जागा जिंकल्या असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामतीत पराभवाला सामोरे जावे लागले.

महाराष्ट्रात काँग्रेसने 13 जागा जिंकल्या आहेत, तर 2019 मध्ये काँग्रेसने चंद्रपूरची एकमेव जागा जिंकली होती. शिवसेना (UBT) 9 जागा जिंकल्या आहेत आणि NCP (शरदचंद्र पवार) 8 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी तिकीट न मिळाल्याने सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजयी झाले.

महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि अविभाजित शिवसेना एकत्र लढले आणि 41 जागा जिंकल्या. भाजपने 25 उमेदवार उभे केले, त्यापैकी 23 विजयी झाले. तर भाजपचा तत्कालीन मित्रपक्ष शिवसेनेने 23 जागांवर निवडणूक लढवली होती आणि 18 जागा जिंकल्या होत्या. तत्कालीन अविभाजित राष्ट्रवादीने 4 मतदारसंघ जिंकले होते, तर काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती.

मुंबईबाबत बोलायचे झाले तर येथेही सत्ताधारी महायुतीला मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (UBT) मुंबईत सहापैकी तीन जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने एक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक जागा जिंकली आहे. तर एक जागा काँग्रेसच्या खात्यात गेली आहे.

फडणवीस यांनी पराभवाचे हे कारण सांगितले

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर सांगितले की, निवडणुका जिंकल्यानंतर भाजप राज्यघटना बदलेल असा खोटा प्रचार विरोधकांनी केला, त्यामुळे राज्यात एनडीएची कामगिरी ढासळली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या वर्षी नोव्हेंबरपर्यंत होणार आहेत.

त्यांनी ‘X’ वर लिहिले की, “पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला पूर्ण बहुमत दिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील. एकट्या भाजपने इंडिया आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. मात्र, निवडणुकीतील जनतेचा जनादेश आहे तसा स्वीकारला पाहिजे. आम्ही सखोल आत्मपरीक्षण करू आणि पुढील विधानसभा निवडणुकीत आमचे नुकसान भरून काढू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *