Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही नसल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडक्या बहिण योजनेला यशस्वी वर्षपूर्ती होत आहे. सव्वा दोन ते अडीच कोटी महिलांना आम्ही या योजनेचा लाभ देत आहोत. दोन दिवसांपूर्वीच जुलै महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक योजना ही दरवर्षी एक प्रक्रियेतून जात असते. पात्रतेचे काही नियम या योजनेसाठी आहेत.माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने काही डेटा आम्हाला दिला आहे.त्यांनी दिलेल्या डेटानुसार पात्र लाभार्थ्यांना लाभ चालू राहणार, अपात्र असणाऱ्यांचा लाभ कमी होईल. 2100 रुपये देण्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ योग्य वेळी घेईल. मात्र आम्ही ही योजना चालूच ठेवणार आहोत. ही योजना बंद होणार नाही. असं माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
तसेच यावेळी त्यांनी पिंक रीक्षा ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत कोल्हापुरात 700 पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना रिक्षा वाटप केले जात आहे. यावर्षी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी 400 पिंक रिक्षाचे उद्दिष्ट असल्याचीही माहिती दिली.