Ahilyanagar Police: नगर शहरात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना गुटखा बाळगणारे एका इसमास चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले आहे.कोतवाली पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी गायकवाड 2 ऑक्टोबर पहाटे 5 च्या सुमारास काळया रंगाच्या गाडीमधे एक इसम गुटखा व सुंगधी तंबाखु घेवुन अहिल्यानगर शहरात येणार असल्याची माहिती संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीवरून दिपक पोपटराव लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर बी एन एस कलम 123.223.274.275 प्रमाणे गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपासही कोतवाली पोलिसांनी सुरू केला आहे.