Kalyan-Dombivli Municipal Corporation : कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर कुणाचा यावर सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे यांनी भाजपला मोठा धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परतल्यावर मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रित बैठक होणार आहे असं देखील रवींद्र चव्हाण म्हणाले.
माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिकामध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. या बैठकीत यावर सविस्तर चर्चा देखील दोघांमध्ये झाली आहे.
तीनही महानगरपालिकेमध्ये महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्यामुळे या जनादेशानुसारच तीनही महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार असल्याची देखील माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.






