Dnamarathi.com

Kalicharan Maharaj : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्याची घटना घडल्याननंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे. या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण महाराजांच्या पुतळ्याचे कामामध्ये एवढा हलगर्जीपणा हा खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात कालिचरण महाराज यांनी आपला राग व्यक्त केला.

निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमाला कालिचरण महाराज यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना मालवण येथील घटनेवरूण संताप व्यक्त केला. तसेच अशा घटनामधील दोशीवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. 

यावेळी बोलताना ते म्हणाले, या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील जो कोणी दोषी आढळून येईल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामाबाबत झालेला हा हलगर्जीपणा हा महाराजांचा अवमान आहे. 

यामध्ये वरिष्ठ नेत्यांचा काही दोष नाही कारण ते स्वतः मूर्तिकार नाही त्यांनी खाली कामे दिले मात्र संबंधितन्नी त्यांचे काम व्यवस्थित केले नाही. यामुळे मूर्तिकारसह जे इंजिनिअर या मध्ये दोषी आहे अशी प्रतिक्रिया कालिचरण महाराज यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *