DNA मराठी

Jalna Rainfall Subsidy Scam : मोठी बातमी! जालन्यातील बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल

jalna rainfall subsidy scam

Jalna Rainfall Subsidy Scam : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अंबड पोलीस ठाण्यात 28 जणांविरुद्ध बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल

24 कोटी 90 लाख 77 हजार रुपयांचा निधी परस्पर हडप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट दस्तावेज तयार करून शासकीय निधीचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीसमोर आली आहे. तर दुसरीकडे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करणं बाकी आहे.

प्रकरण काय?

आरोपींनी 2022 ते 2024 दरम्यान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी राज्य सरकार कडून आलेला 24 कोटी 90 लाख 77 हजार रुपयांचा निधी बोगस खात्यात वळवून हडप केल्याचं चौकशी समितीच्या चौकशीत उघड झालंय. दरम्यान आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे

गणेश ऋषींदर मिसाळ

कैलास शिवाजीराव घारे

विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर

बाळु लिंबाजी सानप

पवनसिंग हिरालाल सुलाने

शिवाजी श्रीधर ढालके

कल्याणसिंग अमरसिंग बमनावत

सुनिल रामकृष्ण सोरमारे

मोहित दत्तात्रय गोषिक

चंद्रकांत तुकाराम खिल्लारे

रामेश्वर नाना जाधव

डिगंबर गंगाराम कुरेवाड

किरण रविंद्रकुमार जाधव

रमेश लक्ष्मण कांबळे

सुकन्या श्रीकृष्णा गवते

कृष्णा दत्ता मुजगुले

विजय हनुमंत जोगदंड

निवास बाबुसिंग जाधव

विनोद जयराम ठाकरे

प्रविण भाऊसाहेब शिनगारे

बप्पासाहेब रखमाजी भुसारे

सुरज गोरख बिक्कड

सुशिल दिनकर जाधव (सहायक महसूल अधिकारी)

वैभव विश्वंभरराव आडगांवकर (नेटवर्क इंजिनियर)

विजय निवृत्ती भांडवले (तत्कालिन संगणक परिचालक)

रामेश्वर गणेश बारहाते (महसूल सेवक)

आशिष प्रमोदकुमार पैठणकर (सहायक महसूल अधिकारी)

दिनेश बेराड (सहायक महसूल अधिकारी)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *