IPL 2025 : बीसीसीआयने क्रिकेटच्या चाहत्यांना आनंदाची बातमी देत. IPL 2025 च्या तारखा जाहीर केल्या आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2025 मार्चमध्ये सुरू होणार आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या तारखांची माहिती दिली. त्यांनी माहिती दिली की आयपीएल 2025 23 मार्चपासून आयोजित केली जाईल. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर माध्यमांशी बोलताना शुक्ला यांनी रविवारी स्पर्धेच्या सुरुवातीची तारीख जाहीर केली.
12 जानेवारी रोजी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएल सुरू होण्याच्या तारखेच्या घोषणेव्यतिरिक्त, भारतीय क्रिकेटच्या प्रशासनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शुक्ला म्हणाले की, देवजीत सैकिया हे जय शाह यांची जागा घेतील आणि प्रभतेज सिंग भाटिया यांची बीसीसीआयचे कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाची घोषणा 18-19 जानेवारी दरम्यान होणार आणि 2025 च्या महिला प्रीमियर लीग (WPL) च्या ठिकाणांचीही लवकरच घोषणा केली जाईल.
काही काळापूर्वी आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. मेगा लिलावात 182 खेळाडू खरेदी करण्यात आले. ज्यावर 639.15 कोटी रुपये खर्च झाले. आयपीएलच्या मेगा लिलावानंतर सर्व संघांमध्ये खूप बदल झाले आहेत.
मेगा लिलावात ऋषभ पंतवर भरपूर पैशांचा वर्षाव झाला. लिलावात पंतला सर्वाधिक 27 कोटी रुपयांना विकण्यात आले. पंतला लखनौ सुपर जायंट्सने खरेदी केले.