DNA मराठी

Mephedrone Drug Factory : मेफेड्रोन ड्रग्सची फॅक्टरी महसूल गुप्तचर संचालनालयाने केली उद्धवस्त, 192 कोटी रुपयांचे तब्बल 128 किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त

img 20251210 wa0004

Mephedrone Drug Factory : वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) या ठिकाणी सुरू असलेला ड्रग्स कारखाना महसूल गुप्तचर संचालनालयाने उद्धवस्त केला आहे. बेकायदेशीर पद्धतीने ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याने “ऑपरेशन हिंटरलँड ब्रू” अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाई दरम्यान 192 कोटी रुपयांचे तब्बल 128 किलो इतक्या वजनाचे मेफेड्रोन ड्रग्स (MD) जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी मेफेड्रोन ड्रग्सच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणारे उपकरणे जप्त केले आहेत.

कारंजा (घाडगे) ठिकाण वर्धापासून सुमारे 75 किलोमीटर दूर आहे. या भागातील जंगलामध्ये

बेकायदेशीररित्या ड्रग्सचा कारखाना चालविला जातोय अशी अत्यंत गोपनीय माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालय नागपूर येथील युनिटला समजली होती. त्या आधारेच DRI च्या पथकाने धाड टाकून हा कारखाना उद्धवस्त केला आहे.

ज्यावेळी ही कारवाई करण्यात आली त्यावेळी या कारखान्यात एमडी ड्रग्स तयार करण्याचे काम सुरू होते. कारवाईत तब्बल 128 किलो मेफेड्रोन (एमडी)  जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत सुमारे 192 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.

‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’

महसूल गुप्तचर संचालनालयाकडून ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत

विदर्भातील ही सर्वांत मोठी कारवाई करण्यात आली आहे. कारंजा (घाडगे) या तालुक्यातील एका निर्जन जंगल भागात मेफेड्रोनची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना समजली होती त्या आधारे  अधिकाऱ्यांनी या भागावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. हा संपूर्ण परिसर पूर्णतः अत्यंत घनदाट जंगलाने व्यापलेला आहे ज्यावेळी कारखान्यात एमडी ड्रग्सची निर्मिती  सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने तिथे छापा टाकला आणि तब्बल 128 किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. शिवाय 245 किलो कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.

दोषींवर कारवाई करणार:- गृहराज्य मंत्री

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे या ठिकाणच्या जंगलात सुरू बेकायदेशीरपणे असलेली एमडी ड्रग्स तयार करण्याची फॅक्टरी महसूल गुप्तचर संचलनालयाने उद्धवस्त केल्याचेनंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

या संदर्भात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना विचारले असता ते म्हणालेत की मी आज वर्धा जिल्हाचा दौरा करणार आहे आणि प्रकरणात दोषी असलेली असलेल्यांवर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *