DNA मराठी

T20 World Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; गिलला धक्का अन् ‘या’ स्टार खेळाडूला पुन्हा संधी

team india

T20 World Cup 2026 : बीसीसीआय मुख्य पुरुष निवडकर्ते अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीने फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात पुन्हा एकदा इशान किशनची निवड करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे शुभमन गिलला टी-20 विश्वचषक 2026 संघातून वगळण्यात आले आहे. अक्षर पटेलला विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी उपकर्णधारपद देण्यात आले आहे. संजू सॅमसनची पहिला यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तर रिंकू सिंगला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आले आहे. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना संघात फिरकीपटू म्हणून स्थान देण्यात आले आहे. जसप्रीत बुमराह जलद गोलंदाजीचे नेतृत्व करतील.

अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा त्याला साथ देतील. हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल (उपकर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (विकेटकीपर)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *