IND VS AUS 4th Test : आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 19 वर्षीय सलामीवीर फलंदाज सॅम कॉन्स्टन्सने कसोटीत डेब्यू केला आहे.
तर दुसरीकडे या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टन्समध्ये वाद पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्याच्या 11व्या षटकात विराट कोहलीने कॉन्स्टासला धक्का दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे पंच आणि सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा यांनी प्रकरण शांत केले. 19 वर्षीय सलामीवीराच्या खांद्याला धक्का दिल्याने आयसीसी विराट कोहलीवर कारवाई करू शकते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावातील 11 वे षटक टाकत होता. ज्यावर नवोदित सॅम कॉन्स्टासने चौकार आणि षटकार ठोकले. त्यानंतर 11व्या षटकाच्या मध्यावर विराट कोहली ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या दिशेने जाताना दिसतो. याच व्हिडिओमध्ये विराट बॉल घेणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर त्याची सॅम कॉन्स्टासशी टक्कर झाली.
आयसीसीचे नियम काय सांगतात ते जाणून घ्या
जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड (ICC) चे नियम पाहिले तर कलम 2.1 नुसार क्रिकेटपटू, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला धक्का दिल्यास आयसीसी कारवाई करू शकते.
या घटनेपूर्वीही क्रिकेटच्या इतिहासात अशी प्रकरणे अनेकदा समोर आली आहेत. आधीच्या घटना पाहिल्या तर कळेल की अशा प्रकरणांमध्ये सामन्यावर बंदी किंवा निलंबनासारखी शिक्षा दिली जात नाही. केवळ सामनाधिकारीच शिक्षा म्हणून सामना फी किंवा डिमेरिट पॉइंट देऊ शकतात.