IND vs AUS 2024: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्याची बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीची सुरुवात 22 नोव्हेंबर पासून होणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज शुभमन गिल सराव सामन्यात जखमी झाल्याने तो पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे जवळपास फिक्स झाले आहे.
तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा देखील पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालसोबत कोण ओपनिंग करणार? याचा उत्तर सर्वांना जाणून घ्याचे आहे.
माहितीनुसार, बीसीसीआय दोन खेळाडूंची सप्राईज एन्ट्री करू शकतो. भारतीय संघात साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांची सरप्राईज एंट्री होऊ शकते. हे दोन्ही फलंदाज भारत अ संघाचा भाग आहेत. जर गिल किंवा इतर कोणताही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला तर या दोघांपैकी एकाला भारतीय संघात प्रवेश मिळू शकतो.
साई आणि देवदत्त यांनी ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना सध्या ऑस्ट्रेलियात राहण्यास सांगण्यात आले आहे. कारण ऑस्ट्रेलियात खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते.
शुभमन गिलची दुखापत किती गंभीर ?
WACA येथे भारताच्या आंतर-संघ सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिलला डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. गिलला इंट्रा-आर्टिक्युलर फ्रॅक्चर झाले असावे अशी माहिती समोर येत आहे. या प्रकारची दुखापत बरी होण्यासाठी साधारणतः दोन ते तीन आठवडे लागतात.