Shrikant Pangarkar : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महानगर पालिकेत नगरसेवक पदी निवडून आल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जालना महापालिका निवडणुकीत श्रीकांत पांगारकर यांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याठिकाणी श्रीकांत पांगारकर विजयी झालेत. गौरी लंकेश यांची सप्टेंबर 2017 मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणात श्रीकांत पांगारकर संशयित म्हणून अटकेत होते. न्यायालयाने सप्टेंबर 2024 मध्ये श्रीकांत पांगारकरना जामीन मंजूर केला होता.. त्यांनतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या जालना महानगरपालिका निवडणुकीत पांगारकर यांनी अपक्ष म्हणून उडी घेतली.
या निवडणुकीत श्रीकांत पांगारकर विजयी झालेत. दरम्यान गौरी लंकेश हत्या प्रकरणात मी निर्दोश आहे. म्हणून माझा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया पांगारकर यांनी दिलीये.
जालना महापालिकेसाठी पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीत भाजपने 41 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप महापौरासाठी कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.






