Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरात काढण्यात आलेल्या एका रंगोळीमुळे धार्मिक भावना दुखावल्याने दोन गटांत वाद झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून अफवांवर लक्ष देऊ नये असे आवाहन अहिल्यानगर पोलिसांकडून करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शहरातील कोठला परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या पुणे – छत्रपती संभाजीनगर हायवे वर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.