Dnamarathi.com

iPhone 16 Pro Max : तुम्ही देखील iPhone 16 Pro Max खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात बंपर डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही आता अगदी कमी किमतीमध्ये iPhone 16 Pro Max घरी आणू शकतात.

सध्या विजय सेल्समध्ये अँपल डेज सेल सुरू आहे ज्यामध्ये आयफोन 16 प्रो मॅक्सवर मोठी सूट देण्यात येत आहे. सध्या तुम्ही हे डिव्हाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून 18,700 रुपयांपेक्षा जास्त सवलतीत खरेदी करू शकता.

गेल्या वर्षी अँपलने हा हँडसेट भारतात 1,44,900 रुपयांच्या किमतीत सादर केला होता. या फोनमध्ये

उत्तम डिस्प्ले, हाय लेव्हल कॅमेरे देण्यात आले आहे. याच बरोबर या फोनमध्ये अँपल इंटेलिजेंसचा सपोर्ट देखील उपलब्ध देण्यात आला आहे.

iPhone 16 Pro Max डिस्काउंट ऑफर

Apple iPhone 16 Pro Max सध्या विजय सेल्स वेबसाइटवर फक्त 1,30,650 रुपयांना विकला जात आहे. या सेलमध्ये या फोनवर 14,250 रुपयांची फ्लॅट सूट मिळत आहे.

याशिवाय, तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून या हाय-एंड डिव्हाइसवर 4,500 रुपयांची अतिरिक्त सूट किंवा ICICI आणि Axis बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांद्वारे 3,00 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. याशिवाय, फोनवर 21 महिन्यांसाठी 6,250 रुपयांपासून सुरू होणारा EMI पर्याय देखील उपलब्ध आहे.

iPhone 16 Pro Max फीचर्स

आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये 2868 x 1320 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.9-इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. नियमित आयफोन मॉडेलच्या तुलनेत, हे डिव्हाइस 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.

या प्रीमियम फ्लॅगशिप हँडसेटमध्ये Apple ची A18 Pro चिप आहे, जी 8GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. याशिवाय फोनमध्ये अँपल इंटेलिजेंस देखील दिसत आहे.

iPhone 16 Pro Max कॅमेरा स्पेसिफिकेशन

आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा आहे, ज्यामध्ये 48 एमपीचा प्राथमिक कॅमेरा आहे ज्यामध्ये 12 एमपीचा पेरिस्कोप टेलिफोटो आहे ज्यामध्ये 5x ऑप्टिकल झूम आहे आणि 48 एमपीचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. या डिव्हाइसमध्ये 4,685mAh ची मोठी बॅटरी देखील आहे जी 25W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *