Hit And Run Law : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत हिट ॲन्ड रन केस प्रकरणी 10 वर्षाची शिक्षा आणि 07 लाख रुपये दंडाची तरतूद केली आहे.
सरकारच्या या निर्णयानंतर अनेक वाहन चालकांनी या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केली आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
तर दुसरीकडे अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ट्रक चालकांनी आंदोलन केल्याने पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची कमतरता होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे अनेक नागरिक वाहनांमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करत आहे. अशीच काही स्थिती अहमदनगर शहरात देखील निर्माण झाली आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
हिट ॲन्ड रन कायदा
केंद्र सरकारने या कायद्याअंतर्गत आता दहा वर्षाची शिक्षा आणि 07 लाख रुपयांचा दंड अशी तरतूद केली आहे. हा कायदा चालकांविरुद्ध असल्याची प्रतिक्रिया अनेक वाहन चालक देत आहे.
या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर अपघात करुन तिथून पण काढलं तर त्या व्यक्तीला दहा वर्षाची शिक्षा आणि 07 लाख रुपयांचा दंड होऊ शकते. मात्र जर अपघात करणाऱ्या व्यक्तीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले तर त्या व्यक्तीची शिक्षा कमी होऊ शकते. यामुळे सध्या या कायद्याविरोधात आंदोलन होत आहे.
आपल्या देशात एका अंदाजानुसार 95 लाख ट्रक आहे मात्र या नवीन कायदा विरोधात सोमवारपासून तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त ट्रक रस्त्यावर धावत नाही.