DNA मराठी

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Hit And Run : शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात 25 नोव्हेंबर संध्याकाळी सातच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून 4 ते 5 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. रविंद्र रमेश कानडे (वय 32, राहणार कानडे मळा, सोलापूर रोड, अहिल्यानगर) असं मयताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात संध्याकाळी 7 च्या सुमारास XUV 500 कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे तर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *