DNA मराठी

Health Tips: सावधान, दुधासोबत ‘हे’ 7 पदार्थ चुकून खाऊ नये, आरोग्यासाठी ठरणार हानिकारक

Health Tips : दूध पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले गेले आहे कारण दुधात पोषक तत्त्व जसे कॅल्शियम, प्रोटीन इतर आढळतात ज्याने शारीरिक विकास होण्यास मदत होते. परंतू दुधाचे सेवन करताना यासोबत कोणते असे पदार्थ आहे जे आहारात सामील करू नये जाणून घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण अशात आरोग्यावर विपरित परिणाम देखील होऊ शकतो.

नमकीन

मीठ आणि दूध याचे सोबत सेवन करणे चुकीचे आहे कारण अशात लिव्हरसंबंधी त्रास उद्भवण्याची शक्यता असते. दुधात प्रोटीन आणि मिठात आयोडीनचे प्रमाण अधिक असल्यामुळे याचा विपरित प्रभाव लिव्हरवर पडतो.

केळी

अनेक लोक वजन वाढवण्यासाठी दुधासोबत केळी खातात परंतू दूध आणि केळ शेक या रूपात घेतल्यास फायदा होतो परंतू ज्यांना फक संबंधी तक्रार असेल त्यांनी याचे सेवन करणे टाळावे.

कच्चा कांदा

दूध पिण्यानंतर किंवा आधी लगेच कच्चा कांदा खाल्ल्याने त्वचा संबंधी समस्या उद्भवू शकते. स्किन इन्फेक्शन, खाज इतर समस्यांना सामोरा जावं लागू शकतं.

मासे

मासे खात असल्यास त्यासोबत दूध किंवा दुधाने तयार कोणतेही पदार्थ खाणे टाळावे. नाहीतर त्वचेवर पांढरे डाग पडू शकतात.

मसालेदार पदार्थ

मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यावर लगेच दूध पिण्याने पचन तंत्रावर विपरित परिणाम होतो. जेवण पचण्यास त्रास होत असून पोट दुखी, जळजळ, गॅस सारख्या समस्यांना सामोरा जावं लागतं.

उडद डाळ

अनेक लोक रात्री उडीद डाळीचे सेवन केल्यावर दूध पितात. परंतू असे केल्याने अन्न पचायला त्रास होतो. सोबतच पोटाशी निगडित समस्यांना सामोरा जावं लागतं.

आंबट पदार्थ

दूध पिण्यानंतर लगेच दही, लिंबू किंवा इतर आंबट फळं खाल्ल्याने अपचन होतं. पोटात दूध फाटल्यामुळे अॅसिडिटी, उलटी किंवा मळमळणे अश्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *